
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी खात आंदोलन केले. ऊस दर जाहीर केला नसल्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना खर्डा भाकरी भेट दिली.
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी खात आंदोलन केले. ऊस दर जाहीर केला नसल्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना खर्डा भाकरी भेट दिली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, अॅड. एस. यु. संदे, प्रकाश देसाई, आप्पासाहेब पाटील, गुंडाभाऊ आवटी, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, पंडित संपकाळ, प्रताप पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, भैरवनाथ कदम, खासेराव निंबाळकर, धैर्यशील पाटील, रविकिरण माने, संतोष शेळके, शहाजी पाटील, प्रविण पाटील, मधुकर डिसले, तानाजी साठे, एकनाथ निकम, प्रकाश माळी, राजाराम परिट, शिवाजी मोरे, भूषण वाकळे, अभिजित नवले, आकाश साळुंखे, निखिल मगदूम, प्रतिम नवले अादी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
तुटलेल्या उसाला ४०० प्रतिटन मिळावे, जाणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३५०० रूपये जाहीर करावा, यासाठी ऊस आंदोलन सुरू आहे. दिवाळीपुर्वी ४०० रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्याला कारखानदारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला अाहे. साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना पैसे देण्यात असमर्थता दाखवली आहे. म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खर्डा भाकरी आंदोलन झाले.
साखर कारखान्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना दिवाळी करणं सुध्दा अवघड झाले आहे. यांचे प्रायश्चित्त म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजरामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या घरासमोर गांधीगिरी मार्गाने खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले. कारखान्याचे अध्यक्ष परगावी असल्याने आम्ही कार्यकारी संचालकांना खर्डा भाकरी भेट दिली.
-भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते