उसाच्या ट्रॅक्टरची डिझेल टँकरला धडक, अपघातामुळे आग; सात वाहने खाक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहने एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

    लातूर – भातखेडा येथील मांजरा नदीच्या (Manjara River) पुलालगत अपघाताची (Accident) घटना घडली आहे. लातूर (Latur) शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला (Diesel Tanker) उसाच्या ट्रॅक्टरने (Sugarcane Tractor) जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने सात वाहन जळून (Vehicle Burn) खाक झाली आहेत. दरम्यान या घटनेत लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    आगीची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथके घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहने एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वाहनांमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टँकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी महामंडाळाची बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्रॉली नसलेले वाहन यांचा समावेश आहे.