प्रेमप्रकरणातून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या ; प्रेयसीवर गुन्हा दाखल

येरवडा येथील प्रकार

    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधानंतर देखील ती नीट बोलत नव्हती. तिची कोणासोबत तरी जवळीक वाढली असावी म्हणूनच ती आपल्याला टाळात आहे, या मानसिक नैराश्यातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आजीच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    याप्रकरणी पोलिसांनी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. जीवन कसबे (वय १६ रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई लक्ष्मी राजू कसबे (वय ३७, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे १ डिसेबर दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा जीवन हा शिक्षण घेत होता. त्याचे एका मुलीबरोबर गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलगी जीवनशी नीट बोलत नव्हती. यामुळे तिचे इतर कोणाशी तरी जवळीक वाढली आहे, असे जीवन यास वाटत होते. त्यातून त्याने मानसिक त्रास होऊन त्याने आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत.