
पत्नीच्या विरहात तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide in Khapa) केली. ही घटना मंगळवारी सकाळचे खापा सुमारास हद्दीतील करजघाट शिवारात उघडकीस आली. ओंकार मारुती ढोक (वय 32 रा. खैरी ढालगाव, ता. सावनेर) असे मृतकाचे नाव आहे.
खापा : पत्नीच्या विरहात तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide in Khapa) केली. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास खापा हद्दीतील करजघाट शिवारात उघडकीस आली. ओंकार मारुती ढोक (वय 32 रा. खैरी ढालगाव, ता. सावनेर) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक ओंकार हा सावनेर येथील वैभव इंडेन गॅस एजन्सीमध्ये वाहन चालक होता. घरचा कर्ता असल्याने प्रपंचाचा भार त्याच्यावरच होता. तो मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलहातून तणावात राहायचा, असे सांगण्यात आले. ओंकार हा सोमवारी दुपारी आपल्या मोठ्या भावाला एक ट्रिप आल्याचे कारण सांगून त्याची कार घेऊन गेला. मात्र, ओंकार हा मंगळवारी गावापासून 3 किमी अंतरावरील करजघाट शिवारातील शेतात झाडाला गळफास अवस्थेत शेतमालकाला आढळून आला.
मृतक ओंकार हा पत्नीपासून वेगळा राहता होता. या प्रकाराची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामाअंती हितेश बनसोड यांच्या हितज्योती रुग्णवाहिकेद्वारे ओंकारचा मृतदेह शवविच्छेदनार्थ सावरेर ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविला. खापा पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.