लॉजमध्येच तरूणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

अंबरनाथ येथील 32 वर्षीय तरूणाने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या (Youth Suicide) केल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. या तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    नाशिक : अंबरनाथ येथील 32 वर्षीय तरूणाने लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या (Youth Suicide) केल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. या तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    खुशाल यशवंत शिंगाडे (रा. वागणी अंबरनाथ जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शिंगाडे सोमवारी (दि.6) शहरात आला होता. नाशिकरोड येथील हॉटेल साई लॉजिंगमधील रूम नं. १०३ मध्ये तो मुक्कामी थांबला होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो आपल्या रूम बाहेर न पडल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

    याबाबत पंकज सोनवणे (रा. निमगाव गोळे जि.अ.नगर) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.