पब्जीवरुन झालेल्या वादातून युवकाची आत्महत्या

हर्षदला गेल्या काही दिवसांपासून पब्जी खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यावरुन त्याच्यात आणि कुटुंबियात नेहमी वाद होत होते. या वादातूनच त्याने आत्मह्तेच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे

    कोल्हापूर : पब्जीचा नाद किती वाईट आहे याची प्रचिती देणारी एक घटना करवीर तालुक्यातील घानवडे गावातून समोर आली आहे. पब्जीच्या नादातून एका युवकानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. हर्षद डकरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

    हर्षदला गेल्या काही दिवसांपासून पब्जी खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यावरुन त्याच्यात आणि कुटुंबियात नेहमी वाद होत होते. या वादातूनच त्याने आत्मह्तेच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    पब्जी हा खेळ जगभरात मोबाईलवर खेळला जातो. होत आहे. यामुळे झालेल्या वादातून अनेकदा दुर्घटना झाल्याचंही आपण पाहिलं आहे. त्यामुळे गेम खेळण्याच्या नादात तरुण काय करतील याचा काहीही नेम नाही असचं म्हणाव लागेल. त्यामुळे पालकांमध्येही चितेंच वातावरण असतं.