suicide of lovers in Adan Reservoir a step taken out of passion to live together

मृतक दोघेही एकमेकांचे शेजारी असून यातील मुलगी विवाहित आहे. तर, मुलगा अविवाहित आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मुलीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी राहत होती. ३ ऑगस्ट रोजी दोघेही घराबाहेर पडले. परंतु, घरी परत पोहोचले नाही. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी अडाण जलाशयातील विहिरीजवळ दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसून आले.

    कारंजा : आयुष्य एकत्रपणे जगता येणे अशक्य होत असल्याने प्रेमी युगुलांनी शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी फॉरेस्ट (रामनगर) (Pimpri Forest) (Ramnagar) येथील अडाण जलाशयात (Adan Reservoir) आत्महत्या (Suicide Reservoir) केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शंकर खिराडे व खुशी मेहता अशी या पंचविशीच्या आतील प्रेमीयुगुलांची नावे असून, दोघेही स्थानिक इंदिरा नगर (Indira Nagar) भागातील रहिवासी आहेत.

    प्राप्त माहितीनुसार, मृतक दोघेही एकमेकांचे शेजारी असून यातील मुलगी विवाहित आहे. तर, मुलगा अविवाहित आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मुलीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी राहत होती. ३ ऑगस्ट रोजी दोघेही घराबाहेर पडले. परंतु, घरी परत पोहोचले नाही. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी अडाण जलाशयातील विहिरीजवळ दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसून आले. सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे सदस्य,पोलीस व स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दरम्यान,या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.