नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; बाप-लेकांनी खोलीत गळफास घेऊन संपवलं जीवन

एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची (Suicide Case) धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर (Nashik Suicide) परिसरात घडली. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन (Nashik Crime) संपवलं.

    नाशिक : एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची (Suicide Case) धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर (Nashik Suicide) परिसरात घडली. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन (Nashik Crime) संपवलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये शिरोडे या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.

    दीपक शिरोडेंचा फळविक्रीचा व्यवसाय

    दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबियांसमवेत नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये राहत होते. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांचा तपास सुरु

    एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. शिरोडे कुटुंबियांच्या शेजाऱच्यांकडे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.