suicide

पश्चिम उपगनरातील कांदिवली पूर्व, क्रांतीनगरमध्ये गेल्या दहा दिवसांत तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या तीन तरुणांमध्ये दोन तरुण बहुजन चाळ या एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. तर तिसरा तरुण या सोसायटीला लागून असलेल्या गणेश चाळ येथील रहिवासी आहे.

    नाशिक : पश्चिम उपगनरातील कांदिवली पूर्व, क्रांतीनगरमध्ये गेल्या दहा दिवसांत तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या तीन तरुणांमध्ये दोन तरुण बहुजन चाळ या एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. तर तिसरा तरुण या सोसायटीला लागून असलेल्या गणेश चाळ येथील रहिवासी आहे.

    तिन्ही तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तिन्ही आत्महत्येप्रकरणी कुरार पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांत परिसरातील ३ तरुणांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

    नीलेश शिखरे, वीरेंद्र गायकवाड, योगेश वाकोडे यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. अवघ्या ५ दिवसांनी म्हणजे ५ डिसेंबर रोजी बहुजन चाळ येथील योगेश वाकोडे (२५) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर १० डिसेंबर रोजी बहुजन चाळ येथील वीरेंद्र गायकवाड (२७) यानेही रात्री ८ च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या तिन्ही आत्महत्येप्रकरणी पोलीस काहीही बोलण्याचे टाळत आहेत. मात्र, तिन्ही घटनांकडे स्थानिक नागरिक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत.