सुजित पाटकरांच्या अडचणीत वाढ! सुजित पाटकर यांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेकडे, 5 दिवसांची पोलीस कोठडी…

पाटकर हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोविड सेंटर घोटाळ्यात ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

    मुंबई : ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कथित कोविड  सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुजित पाटकर (Sujit Patkar) यांना अटक केली आहे. दरम्यान, आता पोलिसांनी ईडीकडून सुजित पाटकरांचा ताबा घेतला. त्यांना काल न्यायालयात हजर केले असता २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. म्हणजे पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे. (Sujit Patkar’s problem increase! Sujit Patkar’s custody to Financial Offenses Branch, 5 days police custody)

    काय आहे प्रकरण?

    दरम्यान, पाटकर हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोविड सेंटर घोटाळ्यात ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. यावर्षी जानेवारी महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावून लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसला देण्यात आलेले कंत्राट व खर्चाची मंजुरी आदींची माहिती मागवली होती. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी सुजित पाटकरांना ईडीने अटक केली होती.