रविवारी मध्य रेल्वेवर ‘या वेळेत’ असणार मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

रविवारी (Sunday) जर तुम्ही बाहेर जाण्याचे नियोजन (Planing) करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा, कारण रविवारी मेगा ब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे, त्यामुळं जर तुम्ही बाहेर जाऊन अडकून पडण्यापेक्षा रेल्वेचे वेळापत्रक (Railway Sunday time table) जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा.

  मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवारी जर तुम्ही बाहेर जाण्याचे नियोजन करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा, कारण रविवारी मेगा ब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे, त्यामुळं जर तुम्ही बाहेर जाऊन अडकून पडण्यापेक्षा रेल्वेचे वेळापत्रक (Railway Sunday time table) जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा. मध्य रेल्वे तसेच हार्बर मार्गावर (Central and Harbour railway mega block) रविवारी दिनांक ७.८.२०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Due to Engineering and Maintenance work mega block)

  खालील ठिकाणी असणार मेगा ब्लॉक

  माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)

  पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  दरम्यान, पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा  बंद राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील  सेवा उपलब्ध असतील. दरम्यान, हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.