sunil raut

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अडचण वाढली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे.

    मुंबई: संजय राऊतांचा (Sanjay Raut) आवाज बंद करण्याचे काम भाजपच्या मदतीने ईडी करत आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केले आहे. संजय राऊतांना आणि  आमच्या कुटुंबाला त्रास देऊन अडकवायचे अशी त्यांची योजना आहे. शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी हे  कारस्थान सुरु असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत  बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत. ते कधीही भ्रष्टाचार करणार नाहीत. कारण बाळासाहेबांनी आम्हाला चांगली शिकवण दिली असल्याचे सुनिल राऊत यांनी सांगितलं.

    शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अडचण वाढली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) चौकशी होणार आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांची चौकशी सुरु झाली आहे.