sunil raut

संजय राऊत यांनी आज NIT भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ही टीका करत असताना त्यांनी मांजर-बोका असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता संतोष बांगर यांची टीका समोर येतेय. संतोष बांगर यांच्या टीकेला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

    नागपूर : आमदार संतोष बांगर यांची आज खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. “संजय राऊत यांच्या कानशीलात वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अशी खोचक टीका संतोष बांगर यांनी केली होती. तसेच संतोष बांगर यांच्याकडून राऊतांचा पिसाळलेला कुत्रा असा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या या टीकेवर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. “संतोष बांगर यांना बघून घेऊ”, असं सुनील राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राऊत आणि बांगर यांच्यात आगामी काळात संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

    संजय राऊत यांनी आज NIT भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ही टीका करत असताना त्यांनी मांजर-बोका असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता संतोष बांगर यांची टीका समोर येतेय. संतोष बांगर यांच्या टीकेला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

    “आम्ही वांरवार मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. अनिल देशमुखांना जो कायदा लावला होता, ज्यावेळी देशमुखांवर आरोप लावले त्यावेळी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमचीसुद्धा अशीच मागणी आहे की, जोपर्यंत एकनाथ शिंदे यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळत नाही तोपर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. आमदार म्हणून काम करावं”, असं सुनील राऊत म्हणाले.

    “संतोष बांगर यांच्या तोंडी या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागू दे, शिवसैनिक या निवडणुकीत संतोष बांगरला ठेचून काढतील हे लक्षात घ्या”, असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी दिलं.

    “संतोष बांगर यांनी ठेचण्याच्या गोष्टी करु नये, शिवसैनिक काही मजोर नाही. त्यामुळे आम्ही पाहून घेऊ”, असंदेखील आव्हान सुनील राऊत यांनी बांगर यांना दिलं.