supporters of gulabrao patil wear bahubali masks and leave for the meeting of uddhav thackeray in pachora nrvb

पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता.

    जळगाव : माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा (Pachora) येथे आज सभा होत आहे. या सभेआधी राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापलेले आहे. सभेत घुसून दाखवा असे आव्‍हान दिल्‍यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे समर्थक त्‍यांचा बाहुबली मुखवटा (Bahubali Mask) घालून पाचोरा येथे रवाना झाले आहेत.

    पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता.

    यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, स्व. आर. ओ. तात्या पाटील हे माझे चांगले मित्र होते. आ. किशोर पाटील यांचे काका होते. त्यांच्या कार्यक्रमाला विरोध नाही. आम्हाला फक्त संजय राऊत हा माणूस महाराष्ट्रात काहीही बोलत आहे. मी फक्त सांगितले की, सभेत काहीही बोलू नका आमचे इतकेच म्हणणे आहे. पण ते स्वतःच म्हणत आहेत की, या सभेत घुसा आणि दगड मारा. असे ते स्वतः म्हणत आहेत.

    आमचा पुतळ्याच्या कार्यक्रमाला विरोधच नाही. आम्हाला सभा कशा बंद पाडता येतात पण उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दूर केले पाहिजे. माझ्यावर त्यांनी आरोप केले ४०० कोटी रुपयांचे तीन वर्षात १२० कोटी दिले होते. त्याच्यातील ९० कोटी त्याच्यातून ८५ कोटी फक्त खर्च केले आहेत.