महाराष्ट्रातील सत्तापेच सुटणार का? 22 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत होणार स्पष्ट

महाराष्ट्राच्या सत्तापेच सुटणार का? याचं उत्तर २२ ऑगस्टच्या सुनावणी दरम्यान मिळु शकत. महाराष्ट्रातील सत्तासंर्षावर सर्वेच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

    मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार स्थापन 15 दिवस उलटून गेले आहे. मात्र, राज्यातील सत्तापेच काही अद्याप सुटलेला नाही. सत्तासंर्घाचा (Maharashtra Political Crisis)  हा पेच सर्वेच्च न्यायालयात पोहचला असून सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत 3 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती. तेव्हापासून तारिख न मिळाल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. अखेर याबाबत सुनावणी तारीख निश्चित करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे.

    सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या या सुनावणी बाबत सगळीकडे उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) कपिल सिब्बल (Kapil Sibbal), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek manu Singvi) तर शिंदे गटाकडून (CM Eknath shinde) हरीश साळवे (Harish Salve) सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. तर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अरविंद दातार बाजू मांडत आहेत.
    दरम्यान, 22 तारखेला सहाव्या क्रमांकावर या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडेल. गेल्या दोन तारखा लांबणीवर गेल्यामुळं आता तरी सुनावणी होणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या कारकिर्दीत प्रकरणाचा फैसला होणार की, मोठ्या पीठाकडे प्रकरण सोपवलं जाणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.