jitendra-awhad-supreme-court

“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हींच्या वेळापत्रकावर निर्णय एकत्रित होईल. कारण दोन्ही याचिका टॅग केलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना या दोन्ही पक्षांबाबत एकत्रित वेळापत्रक द्यावं लागेल. मला आनंद या गोष्टीचा आहे की, आज सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालय थोडंसं आश्चर्यचकित आणि थोडं नाराज दिसत होतं.”

    शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India )पोहचला. न्यायालयाने निर्देश देऊनही अद्याप विधानसभा अध्यक्षांकडून (Assembly Speaker Rahul Narvekar) या प्रकरणी निकाल देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज (१३ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून चांगलंच सुनावलं. तसेच तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला गांभीर्याने घेत नसल्याचं निरिक्षण नोंदवत फटकारलं. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Jitendra Awhad’s statement on the SC hearing)

    काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
    “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हींच्या वेळापत्रकावर निर्णय एकत्रित होईल. कारण दोन्ही याचिका टॅग केलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना या दोन्ही पक्षांबाबत एकत्रित वेळापत्रक द्यावं लागेल. मला आनंद या गोष्टीचा आहे की, आज सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालय थोडंसं आश्चर्यचकित आणि थोडं नाराज दिसत होतं.”

    ते पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एक वाक्य उच्चारलं. ते माझ्या दृष्टीने या सुनावणीतील सर्वात महत्त्वाचं आहे. ते वाक्य म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाहीत. जेव्हा सर्वोच्च न्यायालय तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत असं म्हणतं, तेव्हा त्याचा अर्थ काय हे मी भारताला सांगायला नको,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.