Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit Pawar

महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा मोठा झटका मानण्यात येत आहे.

    Ajit Pawar Group Got Party and Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. हा शरद पवारांना सर्वात मोठा राजकीय धक्का असून, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे.आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर देवगिरीवर आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

    बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू होणार आहे.