बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, सुप्रिया सुळेंची राज्यपालांवर टिका

कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं राज्यपाल म्हणाले आहेत.

  मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी ( Governer Bhagat Singh) मुंबईबाबत केलंल वादग्रस्त विधान चांगलच चर्चेत आहे. त्यांच्या या विधानामुळं राज्यात राजकारणातून तीव्र राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते या प्रकरणी व्यक्त होताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं म्हणत त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

   

  काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  “राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण माहाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची वेळ येते. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर (Bhagat Singh Koshyari Statment) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

  “मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं राज्यपाल म्हणाले आहेत. “ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही”, असंही राज्यपाल म्हणाले आहेत.