ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केंद्राने संसदेत बिल आणावे किंवा अध्यादेश काढावा, सुप्रिया सुळे यांची मागणी

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच हा प्रश्न आला आहे. हा गंभीर विषय असून, याची उकल होण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या ट्रीपल टेस्टमध्ये एम्पेरिकल टेडाचा उल्लेख आहे, सध्याचा नवीन एम्पेरिकल डेटा केंद्राकडे आहे, तो केंदंराने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, आता यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतर मुद्द्यांवर सातत्याने अध्यादेश काढणाऱ्या केंद्र सरकारने, ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा, किंवा याबाबत संसदेत चर्चा करुन विधेयक आणावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच हा प्रश्न आला आहे. हा गंभीर विषय असून, याची उकल होण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या ट्रीपल टेस्टमध्ये एम्पेरिकल टेडाचा उल्लेख आहे, सध्याचा नवीन एम्पेरिकल डेटा केंद्राकडे आहे, तो केंदंराने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.सरकारने हे विधेयक संसदेत मले, तर पूर्ण ताकदीने हे बिल मंजूर करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असेही त्या म्हणाल्या.

    निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आज दिवसभरात ?
    याबबात राष्ट्रवदीच्या सर्व नेत्यांशी आज सकाळपासून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती राजेश टोपेंनी त्यांना पत्र पाठवून केली आहे. याबाबत आज दिवसभरात सर्व पक्ष एकत्र येऊन दिवसभरात महाविकास आघाडी निवडणुकांबाबत निर्णय घेईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.