अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, दिल्लीत लोकशाही चालते की नाही? हे पूर्ण देश बघतो – सुप्रिया सुळे

आमच्याकडून लोकशाही आहे, दिल्लीत लोकशाही चालते की नाही? हे पूर्ण देश बघतो. कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना? लोकशाहीच्या निर्णयानुसार कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे याचा मी स्वागत करते.

    सुप्रिया सुळे : गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अनेक गणपतीच्या मंडळांना भेट दिली. गणरायांना साकडे घालत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. देवेंद्र फडवणीस हे लोकप्रतिनिधी आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांची गाडी अडवली जाणे हे दुर्दैवी आहे. ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पक्षातील नेता असो, त्याच्याकडे न्याय मागायचा अधिकार आहे. पण ते माझे राजकीय विरोधक असले तरी आपण नागपूरच्या मदतीस गेले पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष घरे फोडणे व पक्ष फोडणे, केंद्रीय यंत्रणांमध्ये इतके मग्न असतात त्यांना विकास करण्यासाठी वेळ नसतो. मनातील अनेक महिलांवर हल्ला झाला त्यावेळी गृहमंत्री हे प्रचाराला गेले होते त्यामुळे अशा घटना होत असतात. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे असणारा वेळ त्यांनी घर फोडण्यात व पक्ष फोडण्यात दिला नसता तर नागपूर सारखा प्रकार घडला नसता असा निशाण सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीसांवर साधला आहे.

    सध्या राज्यात व बारामतीमध्ये महागाई, दुष्काळ बेरोजगारी याबाबत मोठी आव्हाने आहेत. देशाच्या सुरक्षितेचा विषय आहे यामध्ये मणिपूरचा प्रकार अजून थांबताना दिसत नाही. कॅनडाने भारतावर आरोप केलेला आहे. एवढी सगळी आव्हाने असताना भारतीय जनता पार्टी कट कारस्थानात मग्न आहे. मला याबाबत आश्चर्य वाटत नाही. ही त्यांची भावना आहे. केंद्राने अचानक एक बैठक बोलावली यामध्ये मोठी कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांना दिलासा दिला तर काहीतरी होईल, दुष्काळ बेरोजगारी आणि महागाईच्या परिस्थितीवर काही चर्चा होईल पण अस काही झालं नाही. महिला विधेयकांबाबत आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे राहिलो. मात्र ही गोष्ट पोस्ट डेटेड चेक असल्याचं समजून आलं,याच्यावर तारीख नसलेलं आढळून आल. ही महिलांची मोठी फसवणूक असल्याचे लक्षात आलं. सातत्याने महिला खासदार बोलत असताना भाजपचे नेते महिलांच्या विरोधात बोलायला सुरुवात करीत होते. त्यांना वाईट वागणूक देत होते. पंतप्रधान मोदी हे जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी काही गोष्टींबाबत आम्ही त्यांना समर्थन देतो. भाजपमध्ये नक्की चाललोय काय? हा एक मोठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे म्हणतात ते खर आहे,भाजप हा पक्ष नसून तो जुमला पक्ष आहे. त्यामुळे मला ही वाटायला लागले यात सत्य आहे.

    पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवीन संसदेत आम्ही खूप अपेक्षेने गेलो होतो, मला जुनी संसद आवडते, कारण या देशाचा सगळा इतिहास तो जुन्या पार्लमेंटमध्ये आहे. तिथल्या भिंती ह्या बोलक्या आहेत. तिथे मोठ्या नेत्याच्या स्वातंत्र्याचा लढा होता. तो पूर्णपणे जुन्या संसदेने पाहिला आहे. माझी या वास्तू सोबत इमोशनल अटॅचमेंट आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानते. ज्यांनी मला मोठ्या लोकांना भेटून दिलं. मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल आहे. जालन्यातील घटनेचा आम्ही जाहीर निषेध केला. पाच दिवसाच्या सेशनमध्ये धनगर आरक्षण महागाई बेरोजगारी व इतर मुद्द्यांबाबत चर्चा करायला हवी होती मात्र असं घडलं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी जुमलेबाजी करायची, यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरात काही पडलं नाही. आमच्याकडून लोकशाही आहे, दिल्लीत लोकशाही चालते की नाही? हे पूर्ण देश बघतो. कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना? लोकशाहीच्या निर्णयानुसार कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे याचा मी स्वागत करते. केंद्राला अनेकवेळा फटका मिळतो. विधानसभा अध्यक्षांना फटकारले आहे. ज्याच्या विरोधात बोललं की काहीतरी कटकारस्थान ते करतात. सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची असते याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण आहे. चौकशी कोणी करायची? राज्यात अशा पण चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केल्या आहेत.