
सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या अजित पवार गटाकडून बॅनरवर दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला होता.
सुप्रिया सुळे : लोकसभा निवडणूकीची सर्व पक्षांची दमदार तयारी सुरु आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांची एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय होत आहे. १०५ आमदार निवडून आणणाऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात प्रचंड दु:ख आणि वेदना आहेत. त्यांना मुख्यमंत्री पद द्यायला हवं होतं. उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, त्यातही ते वाटून देण्यात आलं आहे. पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं तोही अधिकार त्यांना देण्यात आला नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या अजित पवार गटाकडून बॅनरवर दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला होता. या मुद्द्यावरुनही त्यांनी भाष्य केलं. इतके दिवस स्वर्गीय यंशवतराव चव्हाण आठवले नाहीत. पण, देर आये दुरुस्त आहे, अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर दिवंगत मुख्यमंत्री यशवंराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला होता. शरद पवार यांनी त्यांचा फोटो वापरल्यास अजित पवार गटाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार गटाने त्यांचे फोटो वापरणे टाळलं आहे.