सध्याचे राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दसरा मेळाव्यावरुन टिका

शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टिकास्त्र सोडले आहे.

    पुणे : शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुटी पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टिकास्त्र सोडले आहे.

    दरम्यान, दसरा मेळावा (Dasra Melava) ही शिवसेनेची ओळख आहे. आम्हीदेखील दसरा मेळाव्याची उत्सुकतेने वाट पाहत असू.. राजकारण व समाजकारणातील टिका ह्या खिलाडूवृत्तीने घेतल्या पाहिजेत. आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा. दिलदार विरोधक नसतील तर राजकारणाला आणि समाजकारणाल अर्थ उरत नाही, दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava) व्यासपीठावरून आमच्यावरही जोरदार टीका व्हायची. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक येत. पण सध्या दसरा मेळाव्याबाबत जे काही घडत आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे. एखादा नेता फक्त पदाने मोठा होत नाही. तो कर्तृत्त्ववान आणि दिलदार असायला हवा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे.