मी केलेल्या कामांचे श्रेय सुप्रिया सुळेंनी घेतलं; अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिल प्रतिउत्तर

यंदाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या असणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    बारामती मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यात मागील अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यंदाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या असणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी पाणी प्रश्नांवरून तर बारामातीच्या विकासावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच मी केलेल्या कामाचे श्रेय सुप्रिया सुळे घेत आहेत असे त्यांनी प्रचार पत्रात छापले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. अजित पवारांनी माझा प्रचार अहवाल पूर्ण वाचला नसेल आणि आम्ही टीम वर्क केलं आहे. त्यात सगळ्यांचा सहभाग आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही सगळे एकत्र मिळून काम करत आहोत. आम्ही एकच पक्षामध्ये होतो. आत्तापर्यंत झालेले विकास काम म्हणजे टीम वर्क आहे. अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण दादा माझ्या पेक्षा पदाने, वयाने, नात्याने खूप मोठे आहेत आपण मोठ्यांना आदर सन्मान द्यायचा असतो ते मी देते. दादांनी MIDC आणण्याचे आश्वासन दिले होते. आज सगळीकडे MIDC आहे. तशीच ती माझ्याही मतदार संघात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळे तरुणांना नोकऱ्या देखील मिळतील आणि बेरोजगारी कमी होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    पूनम महाजन यांचे तिकीट कापून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पूनमने अनेक वर्षे चांगलं काम केलं आहे. प्रमोद महाजन हे खूप मोठं नाव भाजपमध्येच नाही तर देशाच्या राजकारणात देखील होत. पूनमने युवा मोर्चाच काम केलं आहे. त्यांचं तिकीट का कापलं हे मला माहित नाही. पण माझ्यासाठी पुनमचं तिकीट कापणं हे आश्चर्यकारक असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दुष्काळ बेरोजगारी हे मोठे संकट आहे. माझ्यासाठी देश आधी नंतर राज्य आणि मतदार संघ मला काम करायचे आहे. यावर लक्ष देण्यापेक्षा माझ्यावर टीका केली जात आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टोला लगावला आहे.