supriya sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची घोषणा केली. त्यानंतर सुप्रिया सुळें यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

    आज राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचा 25 वा वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असं  सुप्रिया सुळे यांनी म्हण्टलं आहे.

    काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंना यांना कार्यकारी अध्यक्षपदी दिल्यानंतर, सुप्रिया सुळें म्हणाल्या की, . ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

    सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द

    सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. आणि त्यानंतर त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये ३.३६ लाख मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्या २०१४ आणि २०१९ मध्येही बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून आल्या. १६व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत ११७६ प्रश्न विचारले होते. २०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरूद्ध त्यांनी राज्यव्यापी मोहीम राबविली होती. १० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या वर्धापन दिवसानिमित्त तरुणींना राजकारणात येण्याची आवड निर्माण होण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” नावाच व्यासपीठ सुरू करून तरुणींना राजकारणात येण्याचे आव्हाहन सुप्रिया सुळेंनी केले होते