निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो – सुरेश म्हात्रे यांची टीका

कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली याबाबत बोलताना सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली.

    कल्याण : निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी केली. कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक जवळ आली की अशा घटना घडत असतात, प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही, शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे सांगताना निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका केली.

    कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली याबाबत बोलताना सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली. म्हात्रे यांनी बोलताना कपिल पाटील सध्या कुणा कुणाची भेट घेत आहेत, 2014 ची निवडणूक 2019 ची निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात प्रचाराला गेले होते का? असा सवाल केला. पुढे बोलताना म्हात्रे यांनी आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर, कपिल पाटील दिसत आहेत याचा सगळं श्रेय मतदारांचे त्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणले असा टोला लगावला.

    महाविकास आघाडीच्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभा मधून उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद पाटील पदाधिकारी उपस्थित होते.