Suryadatta Education Foundation
Suryadatta Education Foundation

    पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले. प्रभात रस्त्यावरील सिम्बायोसिस शाळेच्या मैदानावर या क्रीडा स्पर्धा नुकतेच पार पडल्या.

    स्विमिंग स्पर्धेत रौप्यपदक

    टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि स्विमिंग या तीन क्रीडा प्रकारात सूर्यदत्तच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. वाण्या क्षत्रिय, यशश्री साबळे व हर्षिता अमृतकर यांनी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक, अदिती व्हावळ हिने बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक, तर सौम्या दौंडगावळ हिने स्विमिंग स्पर्धेत (ब्रेस्ट स्ट्रोक) रौप्यपदक पटकविले आहे.

    सूर्यदत्तच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

    सूर्यदत्त स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या क्रीडा समन्वयक दिलप्रीत कौर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सूर्यदत्तच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय राहिली. मुलींनी दाखवलेली समर्पण भावना, कठोर परिश्रम आणि खिलाडू वृत्ती कौतुकास्पद होती. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.