
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची तसेच दिशा सालियान जी सुशांत याची सेक्रटरी होती या दोघांची हत्या नसून, आत्महत्या होती असं सीबीआयनं अहवालात म्हटलं आहे. यावेळी प्रकरणावर पूर्णविराम मिळाला होता, पण काल लोकसभेत पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आल्याने यावर चर्चा होत आहे.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत ह्याने जून २०२० मध्ये मुंबईत आत्महत्या केली. त्यानंतर बरंच राजकीय वातावरण तापलं होतं. अगदी महाराष्ट्र ते बिहारपर्यंत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. कोरोनाकाळात ही आत्महत्या झाल्यामुळं कोरोनाचे निर्बंध असल्यामुळं किंवा अन्य कारणामुळं याचा तपास तेव्हा पूर्ण झाला नव्हता. पण यावर आता मागील महिन्यात सीबीआयने आपला अहवाल सादर करत, अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची तसेच दिशा सालियान जी सुशांत याची सेक्रटरी होती या दोघांची हत्या नसून, आत्महत्या होती असं सीबीआयनं अहवालात म्हटलं आहे. यावेळी प्रकरणावर पूर्णविराम मिळाला होता, पण काल लोकसभेत पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आल्याने यावर चर्चा होत आहे.
काय आहे प्रकरण?
कोरोनाकाळात म्हणजे जून २०२० मध्ये मुंबईत अभिनेता सुशांतसिंग राजपूत ह्याने आत्महत्या केली. दरम्यान, त्याची सेक्रटरी दिशा सालियान हिची देखील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला. यानंतर तत्कालीन मविआ सरकारवर व माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले. या दोघांच्या मृत्युच्या सशंयाची सुई माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या दिशेने वळविण्यात आली. आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडशी संबंध असल्यामुळं आणि ठाकरे यांच्य दबावामुळं अभिनेता सुशांतसिंग राजपूत ह्याने आत्महत्या केली असा आरोप भाजपाने केला होता. यावेळी मुंबई पोलीस दबावाखाली काम करत आहे, म्हणून ही केस सीबीआयकडे सोपविण्यात आली.
राणे कुटुंबाचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
दरम्यान, तत्कालीन मविआ सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे वारंवार पत्रकार परिषद घेऊन सुशांतसिंग व दिशा सालियान मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी राणेंनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियन प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन आदित्य ठाकरेंचं नाव अनेकदा घेतलं होतं. व याचा तपास सीबीआयने करण्याची मागणी राणेंनी केली होता. तसेच विरोधकांच्या जोरदार मागणीमुळं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आलं होतं.
काय आहे सीबीआयचा अहवाल?
हे प्रकरण मविआ सरकारच्या काळात असल्यामुळं पोलीस, व तपास यंत्रणा दबावाखाली काम करताहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता, त्यामुळं याची चौकशी व तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी विरोधकांनी केली. सीबीआयने महाराष्ट्र ते बिहार असा तपास केला, मात्र त्यांच्या तपासात कुठेही आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले नाही. उलट दिशा सालियान ही मंद्यधुंद अवस्थेत इमारतीवरुन खाली पडली होती, असं सीबीआयने अहवालात म्हटलं आहे.
काय आहेत राहुल शेवाळेंचे आरोप?
सुशांतसिंग तसेच दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राणे कुटुंबानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंय. रिया चक्रवतीच्या मोबाईलमध्ये AU असा उल्लेख आढळला आहे, म्हणजे आदित्य उद्धव त्यामुळं याचा तपास व्हावा, अशी मागणी लोकसभत शेवाळेंनी केली आहे.
शेवाळेंच्या आरोपानंतर काय म्हणाले आदित्य?
दरम्यान, राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार करताना, शेवाळेंवर टिका केली आहे, तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला त्या घाणीत पडायचे नाही, सीबीआयने तपास केला आहे. पोलीस पुन्हा तपास करतील, पण ज्याचे लग्न व संसार आम्ही वाचवला ते आमच्यावर आरोप करताहेत. यात मी पडणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.