‘माझा भाचा आणि भाऊ किती लाचार, हिंदुत्वासाठी हसत हसत कल्याणची जागा सोडून द्यावी’; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर खोचक टोला

    कल्याण : कल्याणमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोरच हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी आदित्य कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

    कल्याणमध्ये नागरिक भीतीच्या वातावरणात
    कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. गेल्या पंधरा दिवसांत एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला, तर एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि भाजप शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

    प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती

    सुषमा अंधारे यांच्यासोबत कल्याण पूर्व आणि पश्चिमचे शहर प्रमुख सचिन बासरे, शरद पाटील उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे माजी महापौर रमेश जाधव उल्हासनगर शिवसेना पदाधिकारी धनंजय बोराडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    सर्व शक्ती आणि बळाचा वापर फक्त सत्ता संघर्ष सावरण्यासाठी

    एक घटना घडली त्यानंतर आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने रितसर येऊन पोलिसांना निवेदन दिले पोलिसांबरोब चर्चा केली. पोलिसांना सांगितले की, शाळा आणि महाविद्यालय या परिसरात जास्तीची ग्रस्त वाढवली गेली पाहिजे बंदोबस्त असला पाहिजे. परंतु, ही सगळी चर्चा केली निवेदन दिले त्याच्या बिलकुल दहाव्याच दिवशी अजून एक 16 ऑगस्टला घटना घडते 15 दिवसांमध्ये तब्बल तीन घटना आणि तीनही घटना भरदिवसा घडणे हे चिंताजनक आहे.

    पोलिसांचे सर्व घटनांकडे दुर्लक्ष

    या सगळ्यांकडे पोलीस अजिबात लक्ष देत नाहीत कारण कालच रात्री भाजप आणि शिंदे गट यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. संघर्ष झाला पण या सगळ्या सत्ता संघर्षाला सावरण्यामध्ये सगळी गृह खात्याचे एनर्जी वाया जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अजिबात न्याय मिळण्याची काही गुंजाळी नाही.

    गृह खात्याची सर्व शक्ती आणि सर्व बळ सत्तासंघर्षासाठी

    या सगळ्यांमध्ये आज आम्ही जॉईंट सीपी दत्तात्रय शिंदे यांच्याशी आता भेटलो त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांना वाढीव गस्त का वाढत नाही या संदर्भाने ही बोललो त्यांनी आम्हाला असे म्हटलं की मुलीच्या आईने आमच्याकडे तक्रार करायला हवी होती मुळात ही गोष्ट फार विचारणी आहे चिंतनिय आहे की आरोपी तो भर दिवसा अटॅक करतो. महिन्यातून तीन घटना घडतात आणि फिर्यादींना पोलिसांबद्दल आपुलकी वाटत नाही. कल्याणमध्ये गुन्हेगारांचा मोकाट आणि मुक्त संचार आहे याचे कारण एकच आहे ग्रहमंत्र्यांनी गृह खात्याची सर्व शक्ती आणि सर्व बळ सत्ता संघर्षासाठी वापर करण्याचे ठरवले आहे.

    सुषमा अंधारे यांची आर्थिक गुन्हे शाखेवर टीका

    आर्थिक गुन्हे शाखा त्यांना वाटेल त्या पद्धतीने वाटेल त्या माणसाला ताब्यात घेते पण त्याच आर्थिक गुन्हे शाखेला गेल्या आठ दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पुराव्यांच्या सकट मध्यान भोजन घोटाळ्याचे शंभर कोटीपेक्षा जास्त फक्त एका वर्षातल्या एका जिल्ह्याची कागदपत्रे सादर केली, त्यावर ते काय कारवाई करणार आहेत ते उज्ज्वल पगार या विजय जाधव यांच्याच कंपन्यांना गेली अनेक वर्षे काही कंत्राट दिली जातात प्रसाद लाड यांचा काय संबंध आहे? देवेंद्रजी यावर बोलणार आहेत का आणि किरीट भाऊ व्हिडिओच्या सदम्यातून अजून बाहेर निघाले नाहीत का? यावर सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे.