नितू, निलू प्रचंड आगाऊ लेकरं आहेत; वळण लावायला आमचा भाऊ कमी पडला, अंधारेंची राणेंवर टीका

सुषमा अंधारे म्हणाल्या, नितू आणि निलू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांना वळण लावण्यात आमचा भाऊही कमी पडला. माजा जुना व्हिडिओ जे दाखवत आहेत, तो माझा महाविद्यालयातील एका वादविवाद स्पर्धेतील आहे. २० वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ आहे. एखाद्या मुद्द्याच खंडन-मंडन करताना आपण असे बोलताच.

    मुंबई – निलू, नितू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांना वळण लावायला आमचा भाऊही कमी पडला, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे, नितेश राणे व निलेश राणेंवर हल्लाबोल केला.

    सुषमा अंधारे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतानाचा जुना व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. त्या नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

    सुषमा अंधारे म्हणाल्या, नितू आणि निलू हे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांना वळण लावण्यात आमचा भाऊही कमी पडला. माजा जुना व्हिडिओ जे दाखवत आहेत, तो माझा महाविद्यालयातील एका वादविवाद स्पर्धेतील आहे. २० वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ आहे. एखाद्या मुद्द्याच खंडन-मंडन करताना आपण असे बोलताच.

    सुषमा अंधारे म्हणाले, मी कणकवलीत जाऊन राणेंचा जो काही होमवर्क घेतला आहे, त्यामुळे त्यांची कानशिलं लाल झालीयेत. त्यामुळेच ते आता अस्थिर बोलत आहे. माझे जुने व्हिडिओ दाखवत आहे. हरकत नाही. त्यांची स्थिती आपण सजून घेऊयात.