ललित पाटील प्रकरणात निनावी पत्र; सुषमा अंधारे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

  पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात नाशिकहून एक निनावी पत्र आले असून, त्यात नाशिकमधील ४० जणांची नावे आहेत. त्यात पोलीस, राजकीय व इतरांची नावे आहेत. मात्र, त्यात पुरावे नाहीत. पण, यासंदर्भात आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून, त्यांच्याशी चर्चा केली आहे. हे पत्र खरं की खोट याबाबत तपास करावा, अशी मागणी केली असून, ललित पाटीलमध्ये योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.
  सुषमा अंधारेंनी घेतली रितेश कुमारची भेट
  ड्रग्ज माफिया ललित पाटीलप्रकरणी राज्यातील मंत्र्याचे पहिल्यांदा खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी आज (शुक्रवार) पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली.
  सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी
  अंधारे म्हणाल्या, नाशिकवरून एक निनावी पत्र आले आहे. त्यात ललित पाटील ४० जणांना पैसे देत असल्याचे म्हंटले होते. नाशिकमधील काही व्यक्ती व राजकीय आणि इतरांची नावे आहेत. पोलीस ठाण्याच्या नावासह असलेले हे पत्र आहे. मात्र, त्याबाबतचे पुरावे नाहीत. तर ललित पाटीलप्रकरणात तपास करून सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी.
  ड्रग्जसारखा विषय गंभीर
  ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक केली नाही. तर येरवडा कारागृहातून त्याला बाहेर (ससून रुग्णालयात) कोणी पाठवले व तो डॉक्टर हे सर्व पुढे आले पाहिजे. ड्रग्जसारखा विषय गंभीर आहे. त्यामुळे यात सखोल तपास व्हावा.
  व्हिडीओ ट्विट करून केली पोस्ट
  यासोबत काही दिवसांपूर्वी मी एक व्हीडीओ ट्विट केला होता. त्यात पोलीस आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना मध्येच गाडी उभी करून गाडीत पाकीट देत असताना दिसत होते. याची माहिती घेतली. त्यात जे कर्मचारी या व्हिडीओत दिसत आहेत, त्यांच्यावर यापूर्वीच कारवाई झाली आहे.