sushma andhare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वक्तव्ये ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील ‘नारायण वाघ’शी मिळतीजुळती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासमोर जो नेता असतो, त्या नेत्याचं कौतुक एकनाथ शिंदे करतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

    मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अलीकडेच पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. मी अनेकदा शरद पवारांचा सल्ला घेतो, अशा आशयाचं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदेंच्या या विधानवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

    ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा ‘पार्ट -२’
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वक्तव्ये ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील ‘नारायण वाघ’शी मिळतीजुळती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासमोर जो नेता असतो, त्या नेत्याचं कौतुक एकनाथ शिंदे करतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.“मी पवारांचा सल्ला घेतो” या एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला असं वाटतं की, शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्यावर कणभरही विश्वास ठेवला नसेल. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून मला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा ‘पार्ट -२’ आठवला. या चित्रपटात मुख्य व्यक्तीरेखा नारायण वाघ आहे. तो ज्याला बघेल त्याला म्हणायचा, साहेब मी प्रत्येक क्षणी तुमचाच फोटो खिशात घेऊन फिरतो. तशी आमच्या एकनाथभाऊंची गत आहे.”