
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राणेंच्या पूर्वीच्या आणि आज बदललेल्या भूमिका यावरुन अंधारे यांनी टोले लगावले आहेत.
मुंबई – शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांना पत्र (Letter) लिहिले आहे. तसेच, ते सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल झाले आहे. राणेंच्या पूर्वीच्या आणि आज बदललेल्या भूमिका यावरुन अंधारे यांनी टोले लगावले आहेत.
प्रिय नीतू
बाळा,
तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.
पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या-कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल २०१५ सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस, किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला. या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.
मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे . भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.
तुझी आत्या
हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन?
अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? pic.twitter.com/gqShJyGYjv— nitesh rane (@NiteshNRane) November 27, 2022
दरम्यान, सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हीडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुषमा अंधारे या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल टीकात्मक बोलत आहेत. त्या व्हीडिओला उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी हे पत्र नितेश यांना लिहिले असून त्यासोबत नितेश राणेंच्या जुन्या-नव्या वक्तव्यांचा व्हीडिओदेखील शेअर केला आहे.