Suspecting his wife's character, he strangulated her and...

विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी पती हा रात्रभर घटना स्थळावरच झोपला. त्यानंतर सकाळी ५ वाजता आर्णी पोलीस स्टेशन (Arni Police Station) गाठून स्वतःहा पत्नीचा खून केल्याची कबुली (Confession of murder) दिली. या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी देखील काही क्षण चक्रावून गेले.

  आर्णी : चरित्रावर संशय घेऊन पत्नीची दोरीने गळा आवळून (strangulation with a rope) निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली. ही घटना रविवारी ३१ जुलैला रात्री ११ वाजताच्या सुमारास आर्णी तालुक्यातील सुकळी (Sukli in Arni Taluka)
  येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

  सविता विनोद कथलेवाड (Savita Vinod Kathlewad) (२६) (रा. सुकळी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विनोद चंद्रभान कथलेवाड (३४) (रा.कवठा बाजार ह. मु. सुकळी ) असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी पती हा रात्रभर घटना स्थळावरच झोपला. त्यानंतर सकाळी ५ वाजता आर्णी पोलीस स्टेशन (Arni Police Station) गाठून स्वतःहा पत्नीचा खून केल्याची कबुली (Confession of murder) दिली. या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी देखील काही क्षण चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असून सविता ही मृत अवस्थेत आढळून आली.

  दरम्यान शेजारी राहणारे साजन सावन यांनी ही माहिती मृतकाच्या वडिलांना दिली. मृतकाच्या वडील मोतीराम पिटलेवार यांनी घरात जाऊन पाहिले असता सविता मृत अवस्थेत आढळून आली. आर्णी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदना साठी पाठविण्यात आले. त्यानंतर फिर्यादी मोतीराम पिटलेवार यांनी चरित्राच्या संशयावरून (suspicion of character) पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची तक्रार आर्णी पोलीस स्टेशनला दिली. यावरून विनोद विरुद्ध खुनाचा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या मार्गदशनात पोलीस निरीक्षक पितांबर जाधव, शिवराज पवार, अरुण चव्हाण करीत आहे.

  दोन चिमुकल्या झाल्या आनाथ

  आरोपी विनोद कथलेवाड व सविता हिचा २०१४ साली विवाह झाला होता. त्यांना कु. त्रिशा व कु. नित्या विनोद कथलेवाड अशा दोन मुली आहेत. मात्र, या घटनेत आईचा मृत्यू झाला आहे. तर वडील केलेल्या गुन्हाची शिक्षा भोगणार आहे. त्यामुळे, त्रिशा व नित्या या दोघेही अनाथ झाल्या आहे.