समाज कल्याणधिकारी चंचल पाटलांना  निलंबीत करा ; अन्यथा राजीनामा देण्याचा आमदार राम सातपुते यांचा इशारा

जिल्हा परिषद प्रभारी समाजकल्याणधिकारी चंचल पाटील यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करा आशी मागणी माळशिरस आमदार राम सातपुते यांनी जिल्हा नियोजन सभेत केली आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद प्रभारी समाज कल्याणधिकारी चंचल पाटील यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करा आशी मागणी माळशिरस आमदार राम सातपुते यांनी जिल्हा नियोजन सभेत केली आहे.

    सोमवारी जिल्हा नियोजनाची सभा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेदरम्यान गौणखनिजाचे उत्खनन करुन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता . याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग प्रमूख चंचच पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचला. दलितवस्ती विकास निधी देण्यासाठी ५% लाच म्हणून घेतात, हे मलाचं काय जिल्हयातील प्रत्येक आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायात समिती सदस्यांना माहीत आहे. चंचल पाटील यांचा चार्ज काढण्याचे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले आहे. मात्र ते शब्द पाळतील का ? हे मला माहीत नाही . चंचल पाटील आणि त्यांचे लिपीक नरळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मी आमदारकीचा राजीनामा देईन असा इशाराचं थेट आमदार राम सातपुते यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. समाज कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सातत्याने केली आहे. मात्र त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे आ.सातपूते म्हणाले.

    या जिल्हा नियोज सभेस पालकमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,सीईओ दिलीप स्वामी,आ.राजेंद्र राऊत,आ.बबनदादा शिंदे,आ.संजयमामा शिंदे,आ.समाधान आवताडे,दिपक साळूंखेपाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.