Suspicious death of a newlywed murder or suicide Constant harassment by in laws for dowry

सोफिया बानो ही आत्महत्येपूर्वी मध्य प्रदेश स्थित टिकमगढ येथील भाऊ इमरान मोहम्मद याच्यासोबत बोलली होती. त्यावेळी तीने पती व सासरच्या अत्याचाराचे कथन केले. परंतु, ती आत्महत्या कशी काय करू शकते ? असा प्रश्न तिच्या भावाने उपस्थित केला आहे. पोलीस सोफीया बानो यांच्या घरी पोहोचल्यानंतर तिचा मृतदेह हा जमिनीवर ठेवला होता. अशा घटनांमध्ये पोलीस येईपर्यंत गळफासावरील मृतदेह काढल्या जात नाही.

  अमरावती : लग्नाच्या चार महिन्यानंतरच माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा छळ (Harassment of the married) करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. सोफिया बानो मोहम्मद तौफीक (२०) असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मृतक महिलेचा भाऊ इमरान मोहम्मद याच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी( Nagpuri Gate Police) आरोपी पती मोहम्मद तौफीक शेख हातम, सासू, दीर मोहम्मद शफी आणि नंनदेविरुध्द भादंविच्या कलम ४९८ (अ), ३०६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

  माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा

  इमरान मोहम्मद यांनी तक्रारीत म्हटले की, त्यांची लहान बहीण सोफिया बानो हिचा विवाह अमरावतीमधील इतवारा बाजार स्थित मसानगंज परिसरातील रहिवासी तौफीक मंसूरी याच्यासोबत २६ फेब्रुवारी रोजी झाला होता. बहिणीला सासरची मंडळी ही पैसे आणण्याची मागणी करीत होते. यासाठी ते बहिणीला शारीरिक व मानसिक छळ (Physical and mental torture) करून त्रास देत होते. सोफियाचा पती तिला मारहाण करीत होता. त्याने बहिणीला घराबाहेर हाकलून दिले.

  दरम्यान १९ जुलै रोजी सोफिया बानोने आत्महत्येपूर्वी मध्य प्रदेश स्थित टिकमगढ (Tikamgarh located in Madhya Pradesh ) येथील रहिवासी भाऊ इमरान मोहम्मद याच्यासोबत ८ मिनीट बोलली होती. त्यावेळी तीने पती व सासरच्या अत्याचाराचे कथन भावासोबत केले होते. परंतु, ती आत्महत्या कशी काय करू शकते ? असा प्रश्न तिच्या भावाने उपस्थित केला आहे. त्यामुळे सासरच्या जाचामुळेच माझ्या बहिणीने आत्महत्या (Sister committed suicide) केली असा आरोप इमरानने पोलीस तक्रारीतून केला आहे.

  आरोपींना अटक करण्याची मागणी

  मृतक महिलेच्या भावाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह( Police Commissioner Dr. Aarti Singh) यांच्याकडे तक्रार करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सोफीया बानोने गळफास घेतला की तिला गळफास लावण्यात आला, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इमरान मोहम्मद यांनी केली आहे. पोलीस सोफीया बानो यांच्या घरी पोहोचल्यानंतर तिचा मृतदेह हा जमिनीवर ठेवला होता. अशा घटनांमध्ये पोलीस येईपर्यंत गळफासावरील मृतदेह काढल्या जात नाही. परंतु, सासरच्यांनी सोफीया बानोचा मृतदेह गळफासावरून काढून खाली का ठेवला, पोलिसांची प्रतिक्षा का केली नाही, असा सवाल इमरानने केला आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी चौकशी संदर्भात आश्वासन दिले. यावेळी सोफिया बानो यांची मोठी बहीण रजिया बानो (टिकमगढ) या देखील उपस्थित होत्या.