Suspicious death of student at Vidyabharati hostel, in-camera post-mortem to be held at Akola

आदर्शने बुधवारीच आपल्याला वडिलांना कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात. आपण येथे राहत नाही, असे तो म्हणाला होता. आदर्शच्या मृत्यूस वसतिगृह व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रारीतून केली.

  अमरावती : रामपुरी कॅम्पजवळील (Rampuri Camp) पत्रकार कॉलनी (Journalist Colony) स्थित विद्याभारती माध्यमिक विद्यालय (Vidyabharati Secondary School) परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वसतीगृहात (Backward class hostel) एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death of student) झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आदर्श नितेश कोगे (Adarsh Nitesh Koge) (१३, रा. जामली, ता. चिखलदरा, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर जिल्ह्याभरात खळबळ उडाली असून, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Police Commissioner Dr. Aarti Singh) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे.

  झोपल्यानंतर उठलाच नाही आदर्श

  विद्याभारती विद्यालयाच्या इमारतीत असणाऱ्या वसतिगृहात अंदाजे ९० विद्यार्थी राहतात. शिक्षण घेऊन तेथील निवासस्थानील दोन खोल्यांमध्ये हे विद्यार्थी राहतात. बुधवारी रात्री सर्व विद्यार्थी हे आपआपल्या खोल्यांमध्ये झोपले होते. सकाळी शाळेतील कर्मचारी विद्यार्थ्यांना झोपेतून उठविण्यासाठी पोहोचला. त्यावेळी सातव्या वर्गात शिकणारा आदर्श हा झोपेतून उठत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथील कर्मचारी व शिक्षकांनी आदर्शला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांच्या तपासणीत आदर्शला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती आदर्शच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून एकच आक्रोश केला. यावेळी कुटुंबीयांनी वसतिगृह व्यवस्थापनावर आरोप केले.

  वडिलांची गाडगेनगर पोलिसात तक्रार

  आदर्शने बुधवारीच आपल्याला वडिलांना कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात. आपण येथे राहत नाही, असे तो म्हणाला होता. आदर्शच्या मृत्यूस वसतिगृह व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रारीतून केली. विशेष म्हणजे, आ. राजकुमार पटेल (MLA  Rajkumar Patel) यांनीही एका निवेदनातून चौकशीची मागणी केली.

  पीएम अहवालानंतर स्पष्ट होईल मृत्यूचे कारण

  सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडगेनगरचे ठाणेदार  (Thanedar of Gadgenagar)  आसाराम चोरमले( Asaram Chormale ) यांनी तातडीने विद्याभारती माध्यमिक विद्यालय व वसतिगृह गाठून चौकशी सुरू केली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त एम. एम. मकानदार, साहाय्यक आयुक्त पूनम पाटील यांनीही विद्यालय गाठले. यावेळी विद्यालय व वसतिगृहात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यांकडूनही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आदर्शच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आदर्शचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होईल.

  अकोला येथे इन – कॅमेरा शवविच्छेदन

  आदर्शचा मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांनी व्यवस्थापनावर आरोप करीत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे आदर्शच्या मृतदेहाचे अकोला येथे इन – कॅमेरा शवविच्छेदन (In-camera autopsy) करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आदर्शच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.