Swabhimani Shetkari Sanghatana's young district president Nivruti Shewale planted poppy in the field

खटाव तालुक्यात ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि मागील गाळप हंगामातील शिल्लक रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरच्या लढाईची तयारी सुरू केली आहे. राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पडळ आणि गोपूज कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढत ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहे.

    वडूज : खटाव तालुक्यात ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि मागील गाळप हंगामातील शिल्लक रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरच्या लढाईची तयारी सुरू केली आहे. राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पडळ आणि गोपूज कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढत ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहे.

    ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यानी कायद्यानुसार दर जाहीर करने अभिप्रेत आहे.  मात्र पडळ आणि गोपुज साखर कारखान्यांकडून दर जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली आहे. त्याला संघटनेने विरोध सुरू केला आहे. दुष्काळ, रासायनिक खते आणि औषधांचे वाढलेले दर यामुळे ऊस शेतीचा उत्पादन खर्च एकरी २५०० रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे आगामी चार दिवसात ऊस दर जाहीर केला नाही तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करून ऊस तोड बंद ठेवणार आहोत, आणि वाहनधारकांनाही ऊस वाहतूक करू देणार नाही असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.जयसिंगपूर ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे  यंदाच्या गाळप हंगामातील पहिली उचल 3500 रुपये आणि मागील गाळप हंगामातील साखरेच्या वाढीव फायद्यातील आणि उपदार्थातील  जास्तीचे शिल्लक राहणाऱ्या पैशांच्या रूपाने दुसरा हप्ता दिवाळीसाठी शेतकऱ्यांना द्यावा ही संघटनेची प्रमुख मागणी  तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे  केली आहे. पडळ साखर कारखान्याला निवेदन दिल्यानंतर ही रॅली धोंडेवाडी, गोरेगाव,अंबवडे, गुरसाले आणि गोपुज कारखान्यवर नेण्यात आली.बळजबरीने ऊस वाहतूक अथवा ऊस तोडी सुरू ठेवल्या तर ऊस दरावरून संघर्ष झाला तर होणाऱ्या नुकसानीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जबाबदार धरू नये असा इशाराही युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी यावेळी दिला आहे. यावेळी युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव आणि खटाव मान संपर्कप्रमुख शरद खाडे,केशव जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी संतोष तुपे, अविनाश बागल,  अजय पाटील दादा पाटील, विजय माने, माजी सरपंच बापुसो पवार, तानाजी पवार यांनी परिश्रम घेतले. या रॅलीमध्ये  मान तालुक्यातील बीजवडी शाखेचे पदाधिकारी तसेच विखले, दातेवाडी, उंबर्डे, भोसरे, गोपुज, खातवळ, गणेशवाडी हिंगने, कातर खटाव, बोबाळे, भूरकवडी, पेडगाव, आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या रॅली वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पडळ कारखण्यावर शेती अधिकारी किरण पवार तर गोपुज कारखान्यावर प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव आणि मुख्य अकाउंट अधिकारी हणमंत पाटील यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले.