स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णानगर येथे ठिय्या आंदोलन

बेकायदेशीररित्या जिहे कठापूर योजना सुरू केल्याचा शेतकऱ्यांनी विचारला जलसिंचन विभागाला जाब

    सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कण्हेर आणि उरमोडी क्षेत्रांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ सुरू आहे असे असताना कण्हेर धरणातून जिहे कटापूर योजना जलसंपदा विभागाच्या वतीने पुन्हा तयार करण्यात आली तसेच याबाबत राज्य शासनाचा आदेश आल्याचा खुलासा सिंचन विभागाचे अधिकारी करत आहेत या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० शेतकऱ्यांनी मंगळवारी जलसिंचन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले

    चुकीच्या पद्धतीने आंधळी धरणात पाणी सोडण्याचा निषेध यावेळी करण्यात आला. आमच्या हक्काचे पाणी तुम्ही पाठवलेच कसे? असा खडसावून जाब यावेळी उरमोडी विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना विचारण्यात आला. दुपारी एकच्या दरम्यान राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली सातारा कोरेगाव कराड तालुक्यातील दोनशेहून अधिक शेतकरी कृष्णानगर येथील जलसिंचन विभागात दाखल झाले कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी ठिया देत निषेधाच्या घोषणा सुरू केल्या

    जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे हे पाणी सोडण्यात आले आहे असे सांगतात शेतकऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल .राजू शेळके म्हणाले जिहे कठापूर ही योजना चारमाही असून पावसाळ्यातील कृष्णा नदी पात्रात वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी आहे असे असताना १ जुलै ते १४ सप्टेंबर पर्यंतच पाणी उचलण्याची परवानगी होती मात्र जलसिंचन विभागाने १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ही योजना सुरू ठेवली होती चुकीच्या पद्धतीने पाणी आरक्षित असतानाही दुसऱ्या तालुक्यांना पाणी सोडून सातारा कराड तसेच कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची उपसा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजू शेळके यांनी केली.

    जिहेकठापूर योजना १९ जानेवारीपासून सुरू झाली आहे टंचाईच्या काळात कण्हेर उरमोडी दोन क्षेत्रात दुष्काळ असताना तेथील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी चोरी केले जात आहे. हे ताबडतोब थांबवावे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुद्धा योजना बंद ठेवण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती येथील अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत तात्काळ हे पाणी बंद न केल्यास दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या विरोधात समुचित प्राधिकरणाकडे दाद मागण्यात येईल अशा स्पष्ट भाषेत शेळके यांनी खडसावले जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिला.