प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्र

    जालना, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून थकीत वीजबिल वसुलीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या विजपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याच्या धडाका लावलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्यांनं स्वतःला जमिनीत गाडून घेतलंय. मयूर बोर्डे असं या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

    जाफ्राबाद तालुक्यातील खामखेडा येथे या कार्यकर्त्यानं स्वतः ला गाडून घेत महावितरण कंपनी विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत महावितरण कंपनी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ईशारा या कार्यकर्त्यांन दिलाय.