हिंदू मंदिरांभोवतीच घुटमळतोय स्वामींचा मोदीविरोध! विठ्ठल मंदिर सरकारी जाेखडातून मुक्त करण्याची स्टंटबाजी

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी जरी वादग्रस्त व्यक्तिमत्व वाटत असले तरी, ते भाजपचे नेते आहेत. भाजपनेच त्यांना सुरक्षा यंत्रणा पुरवली आहे. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी ते पंढरपूरमध्ये आले होते. येथेही त्यांनी मै मोदीजीकी की सुनता नही ! असे वक्तव्य केले आहे. एका भाजप नेत्याने हे वक्तव्य केल्याने, माजी खासदार सुब्रमण्यम स्वामींचा स्टंट तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    पंढरपूर : भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी जरी वादग्रस्त व्यक्तिमत्व वाटत असले तरी, ते भाजपचे नेते आहेत. भाजपनेच त्यांना सुरक्षा यंत्रणा पुरवली आहे. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी ते पंढरपूरमध्ये आले होते. येथेही त्यांनी मै मोदीजीकी की सुनता नही ! असे वक्तव्य केले आहे. एका भाजप नेत्याने हे वक्तव्य केल्याने, माजी खासदार सुब्रमण्यम स्वामींचा स्टंट तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    भाजपमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा दबदबा आहे. मोदी यांना विरोध करणाऱ्या नेत्याची काय अवस्था होते, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे उत्तराखंड येथील नेते आहेत. देशातील धार्मिक स्थळे सरकारच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी, ते न्यायिक लढा देत आहेत. पंढरपूरचे विठ्ठल मंदिरही सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वामी जानेवारी महिन्यात जनहित याचिका दाखल करणार आहेत. याचवेळी त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर विरोधातही याचिका दाखल करण्याचा निर्णय बोलून दाखवला आहे.

    स्वामी शनिवारी पंढरपूरमध्ये आले. येथील मंदिराभोवतीच्या नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळींना त्यांनी तुकाराम भवनमध्ये मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. देशातील मंदिरांच्या सरकारीकरण्याच्या विरोधात लढा देत असताना, पंतप्रधान मोदींशी संपर्क साधणार काय ? असे विचारले असता, त्यांनी सांगितले. मै मोदीजी की सुनता नाही. आणि या एकाच वाक्यावरून सुब्रमण्यम स्वामी यांची भूमिका एक स्टंट असल्याचे दिसून आले.

    हिंदू मंदिरासंबंधीचे काय आहे मत?

    सुब्रमण्यम स्वामींच्या मते कायद्यानुसार मंदिरांवर सरकारला हक्क सांगता येत नाही. ही मंदिरे सरकारी हस्तक्षेपापासून दूर करण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारीकरण उठवल्यानंतर ही मंदिरे काेणाच्या ताब्यात देणार ? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर बडव्यांच्या जोखडातून मुक्त झाले. आता हे पुन्हा सरकारच्या ताब्यातून काढून घेतल्यानंतर कोणाच्या ताब्यात देणार ? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

    ही तर निव्वळ स्टंटबाजी

    भाजपचे नेते खा. सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे. त्यांनी मंदिरे सरकारमुक्त करण्याचा लढा सुरू केला आहे. भाजप सरकारच्या भूमिकेला विरोध, ही तर सुब्रमण्यम स्वामी यांची स्टंटबाजी आहे. यामागे मोठा कट शिजतो आहे, अशा शब्दात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांनी स्वामी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.