कल्याण मेट्रो मॉल येथे स्वीप टीमने केली मतदान जनजागृती

आज कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघातील जनजागृती टीम तर्फे मेट्रो मॉल जंक्शन, नेतिवली येथे उपस्थित नागरीकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.

    कल्याण : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) अंतर्गत कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली आज कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघातील जनजागृती टीम तर्फे मेट्रो मॉल जंक्शन, नेतिवली येथे उपस्थित नागरीकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.

    यावेळी उपस्थित नागरीकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात करण्यात आले. यावेळी गणेश विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर करुन, त्याचप्रमाणे पी.डी.सी.डान्स ग्रूपने मतदान जनजागृतीपर बहारदार नृत्याचे सादरीकरण करुन मॉल परिसरात मतदान जनजागृती केली.

    मलंग रोड येथील महेश डेअरी, हॉटेल जयमल्हार, आहेर होंडा बाईक शोरुम, रंगीला बार ॲण्ड रेस्टॉरंट, कशीश बार ॲण्ड रेस्टॉरंट, हॉटेल 50-50 धाबा इत्यादी खाजगी आस्थापनांमध्ये जाऊन मतदान विषयक पत्रके वितरीत करुन तेथील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात येऊन त्यांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी प्रणव देसाई, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती डगळे, प्रियंका पडवळ, आदिती पवार, प्रतिक्षा भोईर उपस्थित होते.