नाशिकमध्ये स्वाईन फ्लूची साथ, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; उपचारादरम्यान एकाच मृत्यू

बदलत्या वातावरणामुळे नाशिकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.नाशिकमध्ये स्वाइन फ्लू'चे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. संपूर्ण शहरासह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या वाढली आहे.

  बदलत्या वातावरणामुळे नाशिकरांच्या (Nashik) चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.नाशिकमध्ये ‘स्वाइन फ्लू’चे (swine flu)रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. संपूर्ण शहरासह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या वाढली आहे. सध्या नाशिकमध्ये स्वाइन फ्लू’ चे तीन रुग्ण आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्यातील एका व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

  सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर ऊन असूनसुद्धा स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिन्नरमधील एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर काही तरी थंड पिण्याची इच्छा होते, त्यामुळे थंड पेय घेताना नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान नाशिक महापालिकेकडून करण्यात आले आहे. सध्या सगळीकडे विषाणूजन्य तापाची साथ सुरु असल्याने आता त्यात स्वाईन फ्लू आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. येत्या काही दिवसांमध्ये या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सगळीकडे स्वाईन फ्लूची साथ पसरू नये म्हणून योग्य ती काळजी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

  स्वाईन फ्लूची लक्षण आणि उपचार

  • स्वाईन फ्लू होण्यापूर्वी सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यांसारख्या सामान्य समस्या जाणवू लागतात.
  • घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा इतर लक्षणे जाणवू लागल्यास न्यूमोनिया देखील होऊ शकतो.
  • गर्दीच्या ठिकाणी बाहेर फिरायला जाताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
  • ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार यांसारखे आजार असणाऱ्या लोकांनी आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे.
  • H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला आयसोलेट केले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घेतली पाहिजेत.