
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली आहे. तरीही सरकारकडून कसलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
मराठा आरक्षणाचे आंदोलन आता दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाविषयी अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. या प्रकरणी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील मराठा समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे यांची रविवारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचीही अंत्ययात्रा यावेळी काढण्यात आली. तसेच ग्रामस्थांनी यावेळी मुंडण आंदोलन करून नारायण राणे आणि सरकारचा निषेध नोंदवला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली आहे. तरीही सरकारकडून कसलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तसेच पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना सुरुवातीला साखळी आणि आता आमरण उपषोण सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलनास सुरुवात झाली आहे. त्याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे येथील मराठा समाजाने २६ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
नाराणय राणे आणि गुणरत्न सदावर्तेंची अंत्ययात्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजा विषयी शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राज्याभरातील मराठा समाजाने राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच गुणरत्न सदावर्ते यांनीही मराठा समाजाविषयी वारंवार विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तिऱ्हे गावातील मराठा समाज बांधवांनी आज नारायण राणे आणि गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देत चपलाने मारहाण केली. तसेच संपूर्ण गावातून त्यांची प्रतिकात्मक अत्यंयांत्रा काढली. या अंत्ययांत्रेसाठी सर्व जाती बांधवांच्या नागरिकांनी समर्थन केले आहे.
मुंडण आंदोलन
मराठा आरक्षण मिळावे म्हणून आज तिऱ्हे येथे नारायण नारायण राणे यांच्या अत्यंयात्रेसह आज सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडण आंदोलनही करण्यात आले आहे. मराठा आरक्षण देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. याचा निषेध म्हणून जवळपास 150 तरुणांनी मुंडण करत सरकारचा निषेध नोंदवला.
1 नोव्हेबर पासून आमरण उपोषण
मराठा समाजाच्या आंदोलनाकडून सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून जरांगे पाटील यांनी गावागावात आमरण उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहानाला प्रतिसाद देत तिऱ्हे गावातील मराठा समाज बांधव *शिवश्री .रामकाका जाधव, शिवश्री .योगिराज पाटील आणि शिवश्री .विनोद शिंदे हे* आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती आदोलनाचे समन्वयक शिवश्री रामकाका जाधव यांनी दिली.
नेत्यांना गावबंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तिऱ्हे येथील मराठा समाजासह सर्व जातीय बांधवांनी या आंदोलना पाठिंबा देत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. त्यानुसार गावात कोणत्याही नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गावातील इतर जातीय समाज बांधवांनी देखील पाठिंबा देत उपोषण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.