मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली मात्र लक्षात ठेवा  मीही त्याच पद्धतीचं…” ; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) चाळण झाली आहे. या मुद्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. कोकणी बांधवांनी जमिनी विकू नयेत असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं तसेच मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली. मीदेखील याचं रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे राज ठाकरे म्हणाले.

    “परवा माझ्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. माझ्या पदाधिकाऱ्यांना सरकारने पोलीस ठाण्यात अंतरवस्त्रांवर बसवले होते. सरकार आजचे असो की कालचे, मला त्यांना फक्त हेच सांगायचे आहे की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. माझ्या कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने कारवाई केली, त्याच पद्धतीचं रिटर्न गिफ्ट मीदेखील देऊ शकतो,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.