MPSC students will be hit by the requirement of typing certificate

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीच्या ट्विटवरून देण्यात आली आहे.

    मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा एमपीएससीकडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधीची घोषणा आज करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा मार्ग सुकर झाला आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीच्या ट्विटवरून देण्यात आली आहे. आधी संधींच्या मर्यादेमुळे अनेकांना आपल्या ध्येयापासून मुकावं लागत होतं. मात्र आता तसे प्रकार घडणार नाहीत.