पाच हजाराची लाच घेणे पडले महागात; हेड कॉन्स्टेबल ‘असा’ रंगेहाथ अडकला जाळ्यात

गुन्ह्याच्या कामात मदत करण्यासाठी चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव (वय ४४, चंदगड पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर, सध्या रा. काजूबाग गल्ली गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, मुळ गाव, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज) यास लाच लचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

    कोल्हापूर : गुन्ह्याच्या कामात मदत करण्यासाठी चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव (वय ४४, चंदगड पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर, सध्या रा. काजूबाग गल्ली गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, मुळ गाव, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज) यास लाच लचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांनी कारवाई केली.

    तक्रारदार यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा तपास करीत असलेले पोलीस हवालदार राजीव जाधव यांनी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन नोटीस दिली. गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानूसार पडताळणी केली असता पदाचा दुरुपयोग करुन तडजोडीअंती ४,५०० रपयेू लाच मागितलेचे निष्पन्न झाले.

    याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस उप अधीक्षकसरदार नाळे, संजीव बंबरगेकर, संदीप काशिद, रूपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध आदींनी ही कारवाई केली.