मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं?

11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे.दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.

    नवी दिल्ली : आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील याचिकेसंदर्भातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. .सुधारित वेळापत्रक देण्यासाठी कोर्टाने 30 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आले आहे. आज वेळापत्रक सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केले आहे. वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत आम्ही समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

    कोर्ट काय म्हणाले?
    11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे.दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.