खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपावर टिका

महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो, असेही महेश तपासे म्हणाले.

    मुंबई : पत्राचाळ प्रकरणात (Patra chwal case) चौकशी सुरू आहे, त्यात कुठेही ईडीने शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव घेतले नाही परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची (BJP) पध्दत आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे. पत्राचाळ प्रकरणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला असून, या आरोपाला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    दरम्यान, महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो, असेही महेश तपासे म्हणाले. रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याकडे भाजपचे लक्ष नाही फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरीता भातखळकर यांचे ट्वीट आहे असेही महेश तपासे यांनी म्हटले.