थकबाकीदारांचे नळ कनेक्शन ताेडले; विशेष माेिहमेत ५३ लाख पाणीपट्टी वसूल

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत रेल्वे विभागाकडून ५३ लाख ३४ हजार ९९० वसूल करण्यात आले. तर शहरातील इतर २३ नळ कनेक्शन खंडीत करुन इतर थकबाकीदारांकडून ६४ लाख १५ हजार रक्कम वसुल करण्यात आली.

    कोल्हापूर : पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत रेल्वे विभागाकडून ५३ लाख ३४ हजार ९९० वसूल करण्यात आले. तर शहरातील इतर २३ नळ कनेक्शन खंडीत करुन इतर थकबाकीदारांकडून ६४ लाख १५ हजार रक्कम वसुल करण्यात आली.

    शाहूनगर, फुलेवाडी रिंगरोड, शाहु कॉलनी, चंबुखडी, विशालनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, न्यू शाहूपूरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कदमवाडी या भागामधील ८२ कनेक्शन धारकांकडून थकीत बिलापोटी रक्कम वसुली करण्यात आली. त्याचबरोबर २३ नागरिकांची नळ कनेक्शन थकबाकीपोटी खंडीत करण्यात आली आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे व अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.

    कारवाई सुरूच राहणार

    वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी, सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.