संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गट ग्रामपंचायत जांभूळखेडा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजना कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने निकामी होत मागील 15 दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

    कुरखेडा : गट ग्रामपंचायत जांभूळखेडा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजना कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने निकामी होत मागील 15 दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

    ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत जांभूळखेडा येथे दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक नळयोजनेचे बांधकाम करण्यात आले. गावातील सर्व 225 कुटुंबाना नळजोडणी करण्यात आली. नळांना पाण्याच्या टाकीचे बांधकाम गावात करण्यात आले आहे तर पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे बांधकाम 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सतीनदीचा काठावर आहे. येथून पाण्याचा पुरवठा मोटार पंपाद्वारे टाकीत करण्यात येतो. मात्र, उन्हाळा सुरू होताच येथील मोटार पंपाला आवश्यक दाबाचा विद्युत पुरवठा होत नसल्याने मोटारपंप निकामी होत नळ योजना ठप्प पडते.

    यासंदर्भात स्थानिक पदाधिकारी व गावकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनी कार्यालय कुरखेडा येथे समस्या मांडलेली आहे. नळ योजनेकरिता आवश्यक दाबाचा पुरवठा व्हावा याकरिता स्वतंत्र डीपी बसविण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता यांनी दिले होते. मात्र, अद्याप आवश्यक कार्यवाही न झाल्याने समस्या कायम आहे. डीपी बसवावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणपत बन्सोड यांनी केली आहे.